HistoryOrganizational StructureAdministrationCorporatorsAbout Nashik CityPlaces to VisitImportant NumbersPhoto GalleryContact Us
General AdministrationEncroachmentAuditHealth Public WorksElectricalGardenWater Supply and SewerageTown PlanningWater SupplyEstate ManagementFire Brigade and RescueDisaster ManagementWomen & Child WelfareMedicalSecondary EducationDrainage
General AdministrationEncroachmentAuditHealth Public WorksElectricalGardenWater Supply and SewerageTown PlanningWater SupplyEstate ManagementFire Brigade and RescueDisaster ManagementWomen & Child WelfareMedicalSecondary EducationDrainage
Property TaxWater TaxDownload FormsLocal Body Tax
Property TaxWater TaxDownload FormsLocal Body Tax
About JNNURMCity Development PlanMemorandum of AgreementQuarterly Progress ReportBSUP - List of BeneficiariesMunicipal Solid Waste Management Plan
Total Visitors : 670299   Date: 02 September 2014

वैद्यकिय

सर्व साधारण कामाचे स्वरुप :

 

महानगरपालिका वैद्यकिय विभागामध्ये खालीलप्रमाणे रुग्णालये,प्रसुतीगृहे,शहरी आरोग्य सेवा केंद्रे, दवाखाने, फिरते दवाखाने असुन तेथील दैनंदिन कारभार निवासी वैद्यकिय अधिकारी, मुख्य वैद्यकिय अधिकारी किंवा वैद्यकिय अधिकारी बघतात.

वैद्यकिय विभाग कामकाजाबाबत माहिती

 • वैद्यकिय विभागातील रुग्णालये, प्रसुतीगृहे, शहरी आरोग्य सेवा केंद्रे, दवाखाने, फिरते दवाखाने यांची माहिती खालीलप्रमाणे
 •  

   


  सध्या कार्यरत
  रुग्णालये :
  प्रसुतीगृहे :
  दवाखाने :
  फिरते दवाखाने :

  शहरी आरोग्य सेवा केंद्र

  (केंद्रशासन अनुदानित)

  ७ म.न.पा.ची., १ सिव्हील हॉस्पिटल,

  १ रेडक्रॉस, एकुण ९

  आरसीएच फेज २ :

  अ. रुग्णालय :

   

  १. जे,डी,सी बिटको रुग्णालय, नाशिकरोड - २०० बेडस
  २. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा, नाशिक - १०० बेडस
  ३. इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी, नाशिक - १०० बेडस
  ४. गंगापुर रुग्णालय - ४० बेडस
  ५. सिन्नरफाटा रुग्णालय - ४० बेडस

  एकुण - ४८० बेड्स


  ब. प्रसुती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया यासाठी बेडस :

  १. जिजामाता प्रसुतीगृह, मेनरोड, नाशिक - २५ बेडस
  २. मुलतानापुर प्रसुतीगृह, मुलतानापुर, नाशिक - १२ बेडस
  ३. मायको प्रसुतीगृह, सातपुर - १५ बेडस
  ४. दसक पंचक प्रसुतीगृह, दसक - ३० बेडस
  ५. उपनगर प्रसुतीगृह - ३० बेडस
  ६. मोरवाडी प्रसुतीगृह, सिडको;- १८ बेडस

  एकुण :- १३० बेडस

  नाशिक महानगरपालिकेकडील रुग्णालये व प्रसुतीगृहे येथील एकुण बेडस :- ६१० बेडस

 • वैद्यकिय विभागा मार्फत दिल्या जाणार्‍या सेवा :-
 • प्रसुतीगृहात दिल्या जाणार्‍या सेवा : -
 •  

  १. ओ.पी.डी. विभाग

  २. प्रसुतीपुर्व तपासणी व नाव नोंदणी

  ३. प्रसुती

  ४. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

  ५. लसीकरण

  ६. पॅथॉलॉजी लॅब

   

 • दवाखाने (डिस्पेंसरिज)
 • दवाखान्यांमध्ये बाह्य रुग्णांवर उपचार केला जातो.

 • शहरी आरोग्य सेवा केंद्रांद्वारे दिल्या जाणार्‍या सेवा ;
 • १. साथरोग सर्वेक्षण

  २. लसीकरण

  ३. आरोग्य शिक्षण

  ४. गरोदरमाता गृहभेटी

  ५. सर्व राष्ट्रीय कार्यक्रम अंमलबजावणी

   

 • सुधारित राष्ट्रिय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम :
 • सदर कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे रुग्ण शाधुन त्यावर बरा होईपर्यत मोफत औषधोपचार केला जातो.

   

  नाशिक मनपा क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरण, कुष्ठरोग निर्मुलन, क्षयरोग नियंत्रण, रोग प्रतिबंधक लसटोचणी, कौटुंबिक आरोग्य जनजागृती मोहिम, एड्स जनजागृती मोहीम तसेच जंतनाशक गोळ्या वाटप व जीवनसत्व अ वाटप मोहिम शासनाच्या सुचनेप्रमाणे राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम. दिन व सप्ताह साजरा करणेत आले.

 • हॉस्पीटल्समधील सेवा :-
 •  

  अ. जे.डी.सी. बिटको होस्पिटल

  १. अद्ययावत ४ ऑपरेशन थिएटर्स ( सर्व प्रकारच्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया )
  २. स्वतंत्र आय.सी.यु, वॉर्ड ( अतिगंभीर ह्रदविकाराच्या रुग्णांसाठी
  ३. स्वतंत्र जळीत कक्ष ( बर्न वार्ड )
  ४. अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग ( एन.आय.सी.यु. )
  ५. जनरल वैद्यकिय विभाग
  ६. जनरल बालरुग्ण विभाग
  ७. अद्ययावत अपघात विभाग
  ८. विषबाधा झालेल्या रुग्णांसाठी तत्पर उपचाराची व्यवस्था
  ९. एक्स रे व सोनोग्राफी विभाग
  १०. ब्लड बॅंक पॅथॉलॉजी विभाग
  ११. कॅज्युलिटी विभाग - २४ तास कार्यरत
  १२. स्वतंत्र अस्थिरोग विभाग

  ब. डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल, कथडा व इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी

  १. अद्ययावत २ ऑपरेशन थिएटर्स
  सर्व छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया
  २. जनरल पुरुष व स्त्री मेडीकल व सर्जिकल विभाग
  ३. बालरुग्ण जनरल व अतिदक्षता विभाग
  ४. जनरल ओ.पी.डी. - २४ तास सेवा
  ५. एक्स रे व पॅथॉलॉजी विभाग
  ६. प्रसुती विभाग

  नाशिक मनपा क्षेत्रात पल्स पोलिओ लसिकरण, कुष्ठरोग निर्मुलन, क्षयरोग नियंत्रण, रोग प्रतिबंधक लसटोचणी, कौटुबिक आरोग्य जनजागृती मोहिम, एड्स जनजागृती मोहिम शासनाच्या सुचनेप्रमाणे राष्ट्रिय जनजागृती कार्यक्रम, दिन व सप्ताह साजरा करणेत आले.

  वैद्यकिय विभागाचे सन २०१०-११ चे अपेक्षित उत्पन्न खालिलप्रमाणेs :

 • दवाखाने, रुग्णालय, प्रसुतीगृहे फीपोटी अपेक्षित उत्पन्न : ९५.०० लक्ष
 • मराठा समाज वैद्यकिय महविद्यालय, दंत महाविद्यालय, पंचवटी व इतर विद्यालयांकडुन फी पोटी मिळणारे अंदाजे उत्पन्न : ५.०० लक्ष
 •  

  एकुण : ९९ लक्ष

  तसेच वैद्यकिय विभागाचे सन २०१०-११ चे अपेक्षित शासकिय अनुदान १९९.०० लक्ष इतके असुन त्यात एकात्मिक बाल विकास योजना व शहरी आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत, कुष्टरोग कार्यक्रम अंतर्गत, स्त्री निर्बीजीकरण कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व राखीव बेड्स, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कामी मिळणारे अपेक्षीत अनुदान यांचा समावेश आहे.

  सन २०१०-११ या आर्थिक वर्षासाठी सदर, विभागातील कर्मचार्‍यांवर पगारासाठी र.रु. २२२४.१९ लक्ष अंदाजे इतका खर्च प्रस्ताविक केलेला असुन, सर्व दवाखाने, रुग्णालये, प्रसुतीगृहे यांच्या विद्युत बिल व पाणी बिलापोटी र.रु. ४२,८०,०००/- एवढा खर्च प्रस्तावित केलेला आहे. या व्यतिरीक्‍त सन २०१०-११ या आर्थिक वर्षासाठी दवाखाने, रुग्णालये, प्रसुतीगृहे, शहरी आरोग्य सेवा केंद्रासाठी औषधी, साहित्य व उपकरणे यांचेसाठी ७ कोटी ८१ लक्ष रुपयांची आवश्यकता आहे. म्हणजेच ३० कोटी ४७ लक्ष ९९ हजार रुपये वैद्यकिय विभागासाठी अंदाजे अपेक्षित खर्च धरलेला आहे.

 • वैद्यकिय विभागातील उपलब्ध अधिकारी व कर्मचारी वर्ग :
 •  

  नाशिक महानगरपालिका वैद्यकिय विभागातील रुग्णालय, प्रसुतिगृह, दवाखाना, फिरता दवाखाना, श.आ.सेवा केंद्र येथे सद्य:स्थितीत एकुण ८५ वैद्यकिय अधिकारी, २०२ नर्सिंग स्टाफ व ३९१ इतर कर्मचारी असे मिळुण एकुण ६७० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.